काहींचे देह सांगतात
अमरतेची भीषण गाथा
मातृभूमीच्या सार्वभौमत्वासाठी
कित्येकांचा छेदीला माथा........
बालवृद्ध, नर- नारी होतात
शिकार बॉम्ब आणि गोळ्यांचे
अमानवी आणि पाषाण हृदयाच्या
त्या श्वापदी टोळ्यांचे.......
कसले धर्म आणि कसला वाद
माणसाला कुठे ऐकू येते
माणसाने घातलेली साद
घुमतो फक्त स्वार्थाचा निनाद.....
एखाद्याच्या महत्वाकांक्षेचा सुरुंग
करतो माणुसकी बरबाद
रंजल्या- गांजल्यांना फितवून
सुरू होतो तो दहशतवाद......
सुरू होतो तो दहशतवाद.......
कवयित्री- कावेरी डफळ
No comments:
Post a Comment