Showing posts with label भावगीत. Show all posts
Showing posts with label भावगीत. Show all posts

Tuesday, 3 March 2026

बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का !?!?

शोधुन शिणला जीव आता रे
साद तुला ही पोचंल का
दारोदारी हुडकलं भारी
थांग तुझा कधी लागंल का
शाममुरारी, कुंजविहारी
तो शिरीहारी भेटंल का
वाट मला त्या गाभाऱ्याची
आज कुनी तरी दावंल का
बघ उघडुनी दार, अंतरंगातला देव गावंल का ?

तान्ह्या बाळाच्या हासे रं डोळ्यांत तो
नाचे रंगुन संतांच्या मेळ्यात जो
तुझ्या-माझ्यात भेटेल साऱ्यात तो
शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो
रोज वृंदावनी फोडी जो घागरी
तोच नाथा घरी वाहातो कावडी
गुंतला ना कधी मंदिरी राऊळी
बाप झाला कधी जाहला माउली
भाव भोळा जिथे धावला तो तिथे
भाव नाही तिथे सांग धावंल का
बघ उघडूनी दार, अंतरंगातला देव गावंल का ?

राहतो माउलीच्या जिव्हारात जो
डोलतो मातलेल्या शिवारात तो
जो खुळ्या कोकिळेच्या गळी बोलतो
दाटुनी तोच आभाळी ओथंबतो
नाचवे वीज जो, त्या नभाच्या उरी 
होई काठी कधी आंधळ्याच्या करी
घेवुनी लाट ये जो किनाऱ्यावरी
तोल साऱ्या जगाचाही तो सावरी
राहतो तो मनी , या जनी-जीवनी
एका पाषाणी तो सांग मावंल का
बघ उघडुनी दार, अंतरंगातला देव गावंल का ?



https://dc.kavyasaanj.com/2026/03/bhartiy-bg-ughaduni-daar-antarangatla-dev-ghaval-ka.html

गीतकार : गुरु ठाकूर (चित्रपट : भारतीय (२०१२) )

Friday, 4 April 2025

बाप्पा मोरया रे

गणपती बाप्पा...
मोरया
मंगलमूर्ति...
मोरया


तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांच्या नाथा
बाप्पा मोरया,बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा


बाप्पा मोरया रे,बाप्पा मोरया रे

चरणी ठेवितो माथा (२)


पहा झाले पुरे एक वर्ष
होतो वर्षानं एकदाच हर्ष
गोड अन्नाचा होतो रे स्पर्श
घ्यावा संसाराचा परामर्ष
पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची
वाचावी कशी मी गाथा


बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा

बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे

चरणी ठेवितो माथा (२)


पहा आली कशी आज वेळ
कसा खर्चाचा बसावा मेळ
गूळ फुटाणे खोबरं नि केळं
साऱ्या प्रसादाची केली भेळ
कर भक्षण आणि रक्षण
तूच पिता तूच माता


बाप्पा मोरया रे,बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा

बाप्पा मोरया रे,बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा (२)


नाव काढू नको तांदुळाचे
केले मोदक लाल गव्हाचे
हाल ओळख साऱ्या घरांचे
दिन येतील का रे सुखाचे
सेवा जाणुनी गोड मानुनी
द्यावा आशिर्वाद आता


बाप्पा मोरया रे,बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा

बाप्पा मोरया रे,बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा (२)
https://dc.kavyasaanj.com/2025/04/Bappa-Morya-Re-Prahlad-Shinde-lyrics.html

गायक - प्रल्हाद शिंदे


Monday, 1 March 2021

पाऊले चालती पंढरीची वाट

पाऊले चालती पंढरीची वाट
सुखी संसाराची तोडूनिया गाठ

गांजुनिया भारी दुःख दारिद्र्याने
पडता रिकामे भाकरीचे ताट
पाऊले चालती … 

आप्त‍ इष्ट सारे सगेसोयरे ते
पाहुनिया सारे फिरविती पाठ
पाऊले चालती … 

घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा
अशा दारिद्र्याचा व्हावा नायनाट
पाऊले चालती … 

मन शांत होता पुन्हा लागे ओढ
तस्सा मांडी गोड संसाराचा थाट
पाऊले चालती … 

https://dc.kavyasaanj.com/2021/03/paule-chalati-pandharichi-vaat.html

कवी - दत्ता पाटील





Monday, 2 November 2020

घर असावे घरासारखे

घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम-जिव्हाळा
नकोत नुसती नाती

त्या शब्दांना अर्थ असावा
नकोच नुसती वाणी
सूर जुळावे परस्परांचे
नकोत नुसती गाणी

त्या अर्थाला अर्थ असावा
नकोत नुसती नाणी
अश्रूतुनही प्रीत झरावी
नकोच नुसते पाणी

या घरट्यातुन पिल्लू उडावे
दिव्य घेऊनि शक्ती
आकांक्षांचे पंख असावे
उंबरठ्यावर भक्ती


https://dc.kavyasaanj.com/2020/11/ghar-asawe-gharasarkhe-kavita.html

कवयित्री - विमल लिमये



Thursday, 8 March 2018

मी एकटीच माझी असते

मी एकटीच माझी असते कधीकधी
गर्दीत भोवतीच्या नसते कधीकधी

येथे न ओळखीचे कोणीच राहिले
होतात भास मजला नुसते कधीकधी

जपते मनात माझा एकेक हुंदका
लपवीत आसवे मी हसते कधीकधी

मागेच मी कधीची हरपून बैसले
आता नकोनकोशी दिसते कधीकधी

जखमा बुजून गेल्या साऱ्या जुन्या तरी
उसवीत जीवनाला बसते कधीकधी

कवी - सुरेश भट