Showing posts with label आई. Show all posts
Showing posts with label आई. Show all posts

Wednesday, 1 July 2020

आईपण


जीवनाच्या प्रत्येक वळणावर

आयुष्य नवे वळण घेत असते,

बाईला आईपण मिळते तेव्हा एका

नव्या प्रवासाची सुरवात होत असते.....



मातृत्वाची चाहूल लागताच ती

स्वतः सही विसरू लागते,

पोटातील चिमुकल्या सोबत तीही

आता नव्याने वाढू लागते.....



स्वतःच्या आवडीपेक्षा आता

बाळाच्या पोषणावर तीच लक्ष असतं

गर्भसंस्कार करण्यात तिने स्वतःला

पूर्णपणे गुरफटून घेतलेलं असतं.......



बाळाने मारलेल्या चिमुकल्या पाऊलानेही

तिला आकाशही ठेंगण वाटू लागतं.

बाळासाठी काय काय करायचं यातच

तिचं मन आता रमू लागतं......



प्रसूती वेदनेतही मातृत्वाचा ओलावा असतो

बाळाचा पहिला स्वर ऐकण्याचा आनंद

स्वर्गसुखाहूनही सुंदर असतो.....

स्वर्गसुखाहूनही सुंदर असतो.....

https://dc.kavyasaanj.com/2020/07/aaipan-by-kaveri.html

कवयित्री - कावेरी डफळ










Sunday, 21 June 2020

आई, आई ये ना जरा बाबा कडे बघ

आई, आई ये ना जरा बाबा कडे बघ
बाबाच्या डोळ्यांमधे पावसाचे ढग !

बाबा असा बघायला दिसे ना गं बरा
अळिमिळी  गुपचिळी पडलेला वारा !
हले नाही डूले नाही जसा काही फोटो
आवाजही त्याला माझा लांबूनच येतो !
उभा तर उभा आणि बसे तर बसे
हसे तेव्हा अजुनच कसनुसा दिसे !
विचारले - "बाबा काय पाहतोस सांग ?!"
बघे म्हणे- "आभाळाचा लागतो का थांग
काय सांगू पोरी तुला कळणार नाही
आभाळ न आले हाती; जमीनही नाही!
चहूकडे कोंडलेल्या जगण्याच्या दिशा
हाती नाही काम गाडा चालायचा कसा ?
घोडा झालो तरी काही शिकलोच नाही
विकायाच्या जगामधे टिकलोच नाही !"

आणि मग उठोनिया कुशीमधे मागे घेतो
ओले डोळे पुसोनिया ओली पापी घेतो
घाबरतो जीव; बाबा असे काय बोले ?
चित्रातले रंग त्याच्या जसे ओले ओले
चेहऱ्याचा रंग त्याच्या सांग कोणी नेला ?
हसणारा बाबा कुणी पळवून नेला?

आई, आई ये ना जरा बाबा कडे बघ
बाबाच्या डोळ्यांमधे पावसाचे ढग !!!

कवी - संदीप खरे

https://dc.kavyasaanj.com/2020/06/baba-kade-bagh-kavita-by-sandip-khare.html





https://dc.kavyasaanj.com/2020/06/baba-kade-bagh-kavita-by-sandip-khare.html

Sunday, 14 June 2020

आई अशीही

रोजच्या कामांमध्ये आई
सतत व्यस्त असते
मूल डोळ्यासमोर असलं की
तीही निर्धास्त असते

कामांचा ओघात  होतं
तिचंही थोडं दुर्लक्ष
लबाड मुलंही हळूच
काढतात पळ ठेवून लक्ष

मूल सापडत नाही तोपर्यंत
ती शोध शोध शोधते ,आणि
काळजाचा तुकडा सापडला की
त्याला बदड बदड बदडते

धडधडणाऱ्या हृदयाशी त्याला
घट्ट कवटाळून घेते, पाठीवरच्या
वळांना हळुवार कुरवाळते...
त्याच्या नकळत पाणावलेले
डोळे आपल्या हातांनी पुसते...
आई अशीही असते...
https://dc.kavyasaanj.com/2020/06/aai-ashihi-kavita-by-kaveri.html

कवयित्री - कावेरी डफळ