Wednesday 1 July 2020

आईपण


जीवनाच्या प्रत्येक वळणावर

आयुष्य नवे वळण घेत असते,

बाईला आईपण मिळते तेव्हा एका

नव्या प्रवासाची सुरवात होत असते.....



मातृत्वाची चाहूल लागताच ती

स्वतः सही विसरू लागते,

पोटातील चिमुकल्या सोबत तीही

आता नव्याने वाढू लागते.....



स्वतःच्या आवडीपेक्षा आता

बाळाच्या पोषणावर तीच लक्ष असतं

गर्भसंस्कार करण्यात तिने स्वतःला

पूर्णपणे गुरफटून घेतलेलं असतं.......



बाळाने मारलेल्या चिमुकल्या पाऊलानेही

तिला आकाशही ठेंगण वाटू लागतं.

बाळासाठी काय काय करायचं यातच

तिचं मन आता रमू लागतं......



प्रसूती वेदनेतही मातृत्वाचा ओलावा असतो

बाळाचा पहिला स्वर ऐकण्याचा आनंद

स्वर्गसुखाहूनही सुंदर असतो.....

स्वर्गसुखाहूनही सुंदर असतो.....

https://dc.kavyasaanj.com/2020/07/aaipan-by-kaveri.html

कवयित्री - कावेरी डफळ










No comments:

Post a Comment