वाईट मार्गाने तू खूप पैसे कामावशील
अगदी लक्ष्मी लोळण घेईल तुझ्या दाराशी
एकवेळ पैशाने तू श्रीमंत होशीलही
पण नैतिकतेने मात्र भिकारीच राहशील
आरशासमोर उभा राहून एकदा
स्वतः च्या प्रतिबिंबाकडे जरा बघ
आई-वडील,बायको यांच्यापेक्षाही
प्रतिबिंबाचंच मत जास्त महत्वाचं असतं
तोच तुमचा शिक्षक आणि
तोच तुमचा खरा परीक्षक
आयुष्यभराच्या चांगल्या-वाईट
कामांचा शेवटपर्यंतचा साक्षीदारही
काही लोक तुमच्याविषयी म्हणतील
"हा तर लई मोठा माणूस", पण
प्रतिबिंबाच्या नजरेस नजर देता येत नसेल
तर तो विचारेल, "धनाने की मनाने?"
जगाला मूर्ख बनवून तुला
पुरस्कारही मिळवता येतील पण
प्रतिबिंबलाच फसवशील तर फक्त
अश्रू आणि वेदनाच वाट्याला येतील......
कवयित्री - कावेरी डफळ
वाह!! छान!
ReplyDelete