Saturday, 18 July 2020

पाऊसधारा


घनात घुमला वारा अन
झरल्या झर झर धारा
निसर्ग फुलवी आनंदाने
हिरवा गर्द पिसारा......

गडगडणाऱ्या नभात
विद्युलताही चमकू लागली
इंद्रधनूचा गोफ लेऊनी
जलधारा ही झरू लागली.....

तुडुंब भरले नदी-नाले
दुथडी जाहल्या सरिता,
बळीराजाही सुखावला
वरूणराज बरसता.....

गंध भुईचा दरवळला
माळही सुखाने हिरवळला,
कृतार्थ होऊनि गगन करी स्नेहसरींचा मारा....
स्नेहसरींचा मारा....

https://dc.kavyasaanj.com/2020/07/Pavusdhara-by-kaveri.html
कवयित्री - कावेरी डफळ




No comments:

Post a Comment