Monday, 1 June 2020

खंत


पहाटेच्या धुक्याप्रमाणे
माझं प्रेम विरून गेलं

माणसाचे जसे दिवस फिरतात
तसं ते पण फिरून गेलं

पूर्ण होता होता एक,
सुंदर स्वप्न भंगून गेल,

जिंकूनही आज का बरं,
आपण हरून गेलो,

मृत्यू येण्या आधीच
जिवंतपणी मरून गेलो.....

 कवयित्री- कावेरी डफळ




No comments:

Post a Comment