Monday, 22 June 2020

कवितेनेच डोळे पूस

--हा घे रुमाल माझ्या
काळजाचा
कुठ गेला ? हरवला की काय ?

स्साला
आत्ताच तर इथं होता
हवं तेंव्हाच नेमका सापडत नाही

जाऊ दे
त्याच्या ऐवजी हा कागदच घे आता
या कवितेनच डोळे पूस

आणि नाक शिंकर .

कवी - अरुण कोलटकर 




No comments:

Post a Comment