घेऊनी जन्म तुझ्या उदरी
झाले खरंच धन्य मी
दिलास हा जन्म मजला
अनंत जन्मी ऋणी राहीन मी
जन्मा आले म्हणूनच
पाहू शकले हे विश्व मी
अनुभव शकले तुझी माया,
ममता,प्रेम आणि थोडा रागही
माय आठवते आहे मला
तुझी प्रीती तुझी धडपडही
आणि मजसाठी केलेला
तुझ्या स्वप्नांचा त्यागही
धन्य धन्य तू माय
धन्य धन्य तुझी माया
मला जन्मास घालुनी
दिली ही सुवर्ण काया
तुझ्या उदरी जन्म घेण्याची
आस सदा राहावी
शतजन्मी माय म्हणून
तूच मजला लाभावी
तूच मजल लाभावी...
कवयित्री-कावेरी डफळ
झाले खरंच धन्य मी
दिलास हा जन्म मजला
अनंत जन्मी ऋणी राहीन मी
जन्मा आले म्हणूनच
पाहू शकले हे विश्व मी
अनुभव शकले तुझी माया,
ममता,प्रेम आणि थोडा रागही
माय आठवते आहे मला
तुझी प्रीती तुझी धडपडही
आणि मजसाठी केलेला
तुझ्या स्वप्नांचा त्यागही
धन्य धन्य तू माय
धन्य धन्य तुझी माया
मला जन्मास घालुनी
दिली ही सुवर्ण काया
तुझ्या उदरी जन्म घेण्याची
आस सदा राहावी
शतजन्मी माय म्हणून
तूच मजला लाभावी
तूच मजल लाभावी...
कवयित्री-कावेरी डफळ
खूप सुंदर ������
ReplyDelete