संस्कृती हरवली की मजा येते
म्हणजे तिला खोदकाम करून
शोधाता येतं,
शतकानुशतकं खेळता येतो
संस्कृती शोधण्याचा खेळ.
सापडलेल्या संस्कृतीचे वर्णन वाचताना,
चित्र पाहताना,
अजून काही शतकांची होते शतपावली.
आम्ही पुरतो मातीत
गरज म्हणून बिया
आणि छंद म्हणून संस्कृती.
आम्हाला आवडतं
पुन्हा पुन्हा आदिम व्हायला.
कवी - दासू वैद्य
No comments:
Post a Comment