Thursday, 17 June 2021

विजेता

असतील तुझ्या समोर अनंत अडचणी 
मार्ग तुझा असेल अत्यंत खडतर
अपेक्षा जास्त पण यश मिळत नसेल
हसायचंय पण रडावे लागत असेल 

तुझे मन हजारो चिंतांनी ग्रासलेलं असेल
तेव्हा तू थोडा विसावा घे पण
माघार मात्र तू घेऊ नकोस,कारण
जीवन सदा चढ उतारांनीच भरलेले असेल

मनापासून परिश्रम घेत असशील
तर कधी अपयशही येईल
पण तू प्रयत्न करायचे सोडले नाहीस 
तर विजय मात्र तुझाच होईल

समोरच्याआव्हानांसाठी सदैव सज्ज रहा 
आणि खंबीर मनाने त्यांना सामोरे जा
ऐरण झालास तर घाव सोसत जा आणि 
हातोडा झालास तर घाल घालत रहा.

आज तुझी प्रगती का नाही 
याचा विचार करत बसू नकोस
प्रतिकुल परिस्थितीशी झगडत रहाशील
तर बघ उद्याचा विजेता फक्त तूच असशील

https://dc.kavyasaanj.com/2021/06/vijeta-poem-by-kaveri.html

कवयित्री - कावेरी डफळ





No comments:

Post a Comment