पिठुर चांदण्याने सारे
वातावरण भारून गेले
शब्द झाले मुके अन्
प्रेम मात्र न्हाऊन निघाले.
अंधाराची शाल पांघरून
सागरही निपचित झाला सगळा
पायाखालच्या वाळूचा
आज स्पर्श भासे वेगळा.
चांदण्याने न्हाऊन निघालेली
भुमाताही मृदुमुलायम झाली
ही मादक चांदरात आता
स्वप्नांची सौदागर बनून आली.
रुपेरी चांदण्यात अनेक
आठवणी दाटू लागल्या
चांदण्यांच्या गाण्यांच्या
पुरात सगळ्या मग लोटल्या
उधळलेले ताऱ्यांचे हे सौंदर्य
पाहून मनही आज श्रीमंत झाले
चांदण्यांच्या चमकदार किरणांनी
सागरजलही चांदीच्या रसात न्हाले.
कवयित्री - कावेरी डफळ
No comments:
Post a Comment