ओठांत कुठवर चिरडाव्यात
अंतरीच्या हाका
कवितेच्या सुईने किती
घालावा टाका
जखम चिघळते
घातलेल्याच टाक्यातून
आकाश कोण ओवतं
सुईच्या नाकातून
कवी - नागराज मंजुळे
(कवितासंग्रह : उन्हाच्या कटाविरुद्ध, आटपाट प्रकाशन )
"ओवणी" हि नागराज मंजुळे ह्यांच्या 'उन्हाच्या कटाविरुद्ध' ह्या पुस्तकातून घेतली आहे. त्या पुस्तकाची लिंक सोबत देत आहे :
उन्हाच्या कटाविरुद्ध on Amazon.in
No comments:
Post a Comment