Monday 20 April 2020

तेज तूला पांघरतं

तेज तूला पांघरतं जरी
आत्ता यासमयी ज्योत आहे फडफडती क्षीण

अमूर्त फिकट सूतकी मनुष्य तिथे खडा आहे
सूर्यास्त समयी
मृत्यूघटिका समीप मुकाट्याने घुटमळते आहे... एकटीच

अग्नीमय आहेत या दाहकशुद्ध खूणा
उध्वस्त दिवसाच्या 

फळभाराने वाकलेली फांदी
तुझ्या गडद वस्त्रावर झुकलीय
रात्रीची मूळं अचानक तुझ्या
आत्म्यातून उगवली आहेत
अन्   तुझ्यात दडलेल्या एकेक गोष्टी बाहेर येतायत

तुझी नवजात फिकट अर्भकं त्यातून पोषण घेतायेत
हे महान अफलातून सुपीक भूमी
तू तर चुंबकीय गुलाम आहेस
त्या सोनेरी काळ्या महान गोलाची
तो उगवतो ,  मावळतो आणि निर्माण करतो
आयुष्यही देतो भरभरून, फुलंही फुलवतो आणि तो दुःखभारीही  आहेच
. . .
मूळ कविता ~ पाब्लो नेरूदा
'The light wraps you'

अनुवाद ~ जुई




No comments:

Post a Comment