Saturday, 8 March 2014

सांजवेळी


कधी जाते 'मन' त्या दिवसांत 
जेव्हा घडले स्वप्नवत सारे 
कधी येते जावोनी क्षणांत 
जेव्हा रडले मन स्वप्नामधे

उगाच फिरते विहंगासम 
उंच नभी पंख पसरोनि 
तर कधी पाण्यातल्या बकासम
उगाच सोंग रमल्यागत करि

dc-kavyaSampda

उर्जा कोठूनी मिळते त्यास 
वाटले विचारोनि घ्यावे त्यास 
म्हणे- आजवरी घडले खास 
कधी सुख कधी दु:खाची रास 

ओलांडोणि सगळे सागर 
पार करावे असे सात 
आवळोनी एखादा राग 
गावे गीत देत साद

विचार कसलाच न होऊ द्यावा 
उडण्या अगोदर उंच नभी 
विचार सोड जगन्या-मरण्याचा 
उडोनि बघ एकदा- उंच नभी 

साद घालती कोणीतरी 
वाटेल तुला जेव्हाही 
नाद असा जडेल जीवाशी
जाणवेल तुला उडतानाही

बघ हिरवी शेत
उंच डोलनारी शिखर 
'सांजवेळी' मात्र
परतावे घरी लागणार

- धनंजय चौधरी


[ Published in "अस्तित्व " MESCOE, Pune dated 26 Dec 2011]





Friday, 14 February 2014

शब्दाविणा जाणून घे!

कुठेतरी कधीतरी
दिसली ती परी
जणू नभातून माझ्यासाठी
होती ती अवतरली

दोन तीन क्षणांचा
योग होता मिलनाचा 
शब्द शब्द शोधताना 
काटा सरकला काळाचा

काय सांगू मला
काय काय होते सांगायचे
डोळ्यात पाहिले तिच्या
अन् सांगायचे राहून गेले

तिच्याशी बोलताना
आवाज तो थरथरला 
काळजाचा ठोका माझा 
आनंदाने गहीवरला 

कधी जादू झाली
कोणता प्रसंग आठवू 
कशी झाली सुरवात
काय काय मी सांगू

मनाची अवस्था अशी
पुर्वी कधी झाली नव्हती 
का कुणास टाऊक 
येई सागराला जशी भरती 

अजूनही उमगत नाही
कोड त्या क्षणांचे
कसे व्यक्त करू 
माधुर्य त्या प्रीतीचे

माझच मला कळत नाही
माझ्या मनाला समजून हे
शब्दात मांडता येत नाही
शब्दाविणा जाणून घे
शब्दाविणा जाणून घे!!!!
https://dc.kavyasaanj.com/2014/02/shabdavina-janun-ghe-by-dc.html
धनंजय चौधरी




Thursday, 15 March 2012

Tuesday, 14 February 2012

साथ मला देशील का

साथ मला देशील का...

येऊन सायंकाळी अचानक
मनाला माझ्या भेट देशील का?
लाजून बुजून खेळ गुपचूप
नजरेचा तो खेळशील का?

पुनव रात्री चंद्र आभाळी
फुलेल आज रातराणी
माळून केवडा केसांत तुझ्या
गाशील का प्रेम गाणी?

विचार सोड सजनी
काय माझ्या ध्यानी
भुरळ घातली अशी
तूच माझ्या मनी

साथ मला देशील का
प्रीत नवी गंध नवा
रूप तुझे शृंगार नवा
आज बळावेल आशा
गोड गालात हसशील का?

रूप गोजिरे मुख हसरे
झुरवतात तुझे नखरे
सोड ना अबोला अन
अचंबून टाकणारे ते रुसवे

कशाला तुझा रुसवा
हवा नेहमी सोबतीला
कोमेजून टाकतो तो
माझ्या प्रीतीच्या फुलाला

छळतेस तू जाताना
अर्ध्या स्वप्नानंतर का?
पूर्ण रात्र ढळताना
साथ मला देशील का?
साथ मला तू देशील का?

A photo posted by Dhananjay Choudhari (DC) (@c_dhananjay)
https://dc.kavyasaanj.com/2012/02/dc-sath-mala-deshil-ka.html

 - धनंजय चौधरी


[Published in MESCOE Art Gallery in SAGA-2011 event on date 26th March 2011]