Saturday 8 March 2014

सांजवेळी


कधी जाते 'मन' त्या दिवसांत 
जेव्हा घडले स्वप्नवत सारे 
कधी येते जावोनी क्षणांत 
जेव्हा रडले मन स्वप्नामधे

उगाच फिरते विहंगासम 
उंच नभी पंख पसरोनि 
तर कधी पाण्यातल्या बकासम
उगाच सोंग रमल्यागत करि

dc-kavyaSampda

उर्जा कोठूनी मिळते त्यास 
वाटले विचारोनि घ्यावे त्यास 
म्हणे- आजवरी घडले खास 
कधी सुख कधी दु:खाची रास 

ओलांडोणि सगळे सागर 
पार करावे असे सात 
आवळोनी एखादा राग 
गावे गीत देत साद

विचार कसलाच न होऊ द्यावा 
उडण्या अगोदर उंच नभी 
विचार सोड जगन्या-मरण्याचा 
उडोनि बघ एकदा- उंच नभी 

साद घालती कोणीतरी 
वाटेल तुला जेव्हाही 
नाद असा जडेल जीवाशी
जाणवेल तुला उडतानाही

बघ हिरवी शेत
उंच डोलनारी शिखर 
'सांजवेळी' मात्र
परतावे घरी लागणार

- धनंजय चौधरी


[ Published in "अस्तित्व " MESCOE, Pune dated 26 Dec 2011]





No comments:

Post a Comment