Thursday 25 March 2021

दमलेल्या बाबाची कहाणी

कोमेजून निजलेली एक परी राणी,

उतरले तोंड, डोळा सुकलेले पाणी..

रोजचेच आहे सारे काही आज नाही

माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही..

झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत

निजतंच तरी पण येशील खुशीत

सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला

दमलेल्या बाबाची हि कहाणी तुला

ना ना ना ना नाऽऽऽऽऽऽऽऽ ना ना ना ना नाऽऽऽऽ


आट-पाट नगरात गर्दी होती भारी

घामाघूम राजा करी लोकलची वारी..

रोज सकाळीस राजा निघताना बोले

गोष्ट सांगायचे काल राहुनिया गेले

जमलेच नाही काल येणे मला जरी

आज परी येणार मी वेळेतच घरी

स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी

खऱ्याखुऱ्या पारीसाठी गोष्टीतली परी..

बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला

दमलेल्या बाबाची हि कहाणी तुला

ना ना ना ना नाऽऽऽऽऽऽऽऽ ना ना ना ना नाऽऽऽऽ


ऑफिसात उशिरा मी असतो बसून

भंडावले डोके गेले कामात बुडून

तास–तास जातो खाल मानेने निघून

एक-एक दिवा जातो हळूच विझून..

अशावेळी काय सांगू काय काय वाटे

आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे..

वाटते कि उठुनिया तुझ्या पास यावे

तुझ्यासाठी मी पुन्हा लहानगे व्हावे..

उगाचच रुसावे नि भांडावे तुझ्याशी

चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी


उधळत खिदळत बोलशील काही

बघताना भान मला उरणार नाही..

हसूनिया उगाचच ओरडेल काही

दुरूनच आपल्याला बघणारी आई

तरी सुद्धा दोघे जण दंगा मांडू असा

क्षणा-क्षणावर ठेवू खोडकर ठसा

सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला

दमलेल्या बाबाची हि कहाणी तुला

ना ना ना ना नाऽऽऽऽऽऽऽऽ ना ना ना ना नाऽऽऽऽ


दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई

मउ-मउ दुध भात भरवेल आई

गोष्ट ऐकायला मग येशील न अशी

सावरीच्या उशीहून मउ माझी कुशी..



कुशी माझी सांगत आहे ऐक बाळा काही

सदोदित जरी का मी तुझ्या पास नाही

जेऊ, खाऊ, न्हाऊ, माखू घालतो ना तुला

आई परी वेणी फणी करतो ना तुलाऽऽऽऽऽऽऽऽऽ

जेऊ, माखू न्हाऊ, खाऊ घालतो न तुला

आई परी वेणी-फणी करतो ना तुला

तुझ्यासाठी आई परी बाबासुद्धा खुळा

तो हि कधी गुपचूप रडतो रे बाळा

सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला

दमलेल्या बाबाची या कहाणी तुला

ना ना ना ना नाऽऽऽऽऽऽऽऽ ना ना ना ना नाऽऽऽऽ (२)


बोल्क्यामध्ये लुक-लुक्लेला तुझा पहिला दात

आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मउ भात

आई म्हणण्या आधी सुद्धा म्हणली होतीस बाबा

रांगत-रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा..

लुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाउल पहिलं

दूरचं पहात राहिलो फक्त, जवळ पहायचंच राहिलं


असा गेलो आहे बाळा पुरा अडकून

हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून..

असा कसा बाबा देव लेकराला देतो

लवकर जातो आणि उशिराला येतो..

बालपण गेले तुझे गुज निसटून

उरे काय तुझ्या माझ्या ओंजळी मधून..



जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे

नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे

तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं

मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं..

सासुर्याला जाता-जाता उंबरठ्या मध्ये

बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये….

ना ना ना ना नाऽऽऽऽऽऽऽऽ ना ना ना ना नाऽऽऽऽ

ना ना ना ना नाऽऽऽऽऽऽऽऽ ना ना ना ना नाऽऽऽऽ

 
https://dc.kavyasaanj.com/2021/03/aayushyawar-bolu-kahi-sandip-khare.html

कवी - संदीप खरे 



"दमलेल्या बाबाची कहाणी" हि संदीप खरे ह्यांच्या 'आयुष्यावर बोलू काही' ह्या मुसिक अल्बम मधून घेतली आहे. त्याची लिंक सोबत देत आहे :

1. दमलेल्या बाबाची कहाणी on Amazon.in: click on image👉
2. आयुष्यावर बोलू काही on Amazon.in: click on image👉

3.




No comments:

Post a Comment