Tuesday 25 August 2020

जरा आठवावी आई

देती वागणूक "हीन"

जगी सारेच "बाईला"

नको विसरू मानवा

जन्म दिला "त्या" आईला

पत्नी, भगिनी, मुलगी

किती रुपे घेते बाई

तिच्याकडे बघताना

जरा आठवावी "आई"

"बाईपण" जगताना

नाही कोणीच "सोबती"

कोणी मारतात "धक्के"

कुणी "डोळ्याने" भोगती

खोटा "पुळका" आणती

वागतात पार "खोटे"

मदतीच्या बहाण्याने

जमतात "लाळघोटे"

एकतर्फी प्रेमामध्ये

जर आलाच "नकार"

रस्त्यावर पेटवतो

"मत्त" पुरुषी विखार

सौंदर्याचा अभिशाप

वासनांचा "दुराचार"

"पाचवीला" पुजलेले

बलात्कार, अत्याचार

कधीतरी नारीच्याही

करा विचार "मनाचा"

द्यावा "मोकळ्या" मनाने

हक्क "माणूसपणाचा"
https://dc.kavyasaanj.com/2020/08/jara-aathwavi-aai-by-gajanan-tupe.html

कवी : गजानन तुपे







No comments:

Post a Comment