आज इथे उद्या तिथे
जाउ तिथे खाउ
कार्यकर्ते मात्र इथे
उगाच करतात बाउ
सकाळ अन् संध्याकाळ
शब्दांचे फुले वाहू
फक्त एकदा मत द्या
पुन्हा वळून नका पाहु
आश्वासनांच्या पुड्या
'विकास' देखील दाउ
भूमिपूजन, उद्घाटन, मेळाव्यातून
दांडगा 'जन-संपर्क' साधू
अमक्क करू, ढमक्क करू
याव करू अन् त्याव करू
चांगल करू, छान करू
मतदारसंघाचं 'नाव' करू
पत्रके वाटू रॅली करू
सगळयांना एक नारा देऊ
करायचं किंवा नाही करायचं
ते निवडून आल्यावर पाहु
'आचारसंहिता' आपली वेगळी
आचार आपला वेगळा दाउ
मतांचं गणित जुळवण्यासाठी
जातीचं समीकरण वापरुन पाहू
युती, आघाडी , आलियन्स
वेगवेगळी नावे देऊ
नाही जमल्यास तसं काही
एकमेकांची "धुणी" धुवू
प्रचार, प्रसार आणि 'प्रसाद'
यांवर पाण्यासारखा पैसा वाहू
निवडून आल्यावर मात्र
आपलं घोडं गंगेत न्हाऊू !
जाउ तिथे खाउ
कार्यकर्ते मात्र इथे
उगाच करतात बाउ
सकाळ अन् संध्याकाळ
शब्दांचे फुले वाहू
फक्त एकदा मत द्या
पुन्हा वळून नका पाहु
आश्वासनांच्या पुड्या
'विकास' देखील दाउ
भूमिपूजन, उद्घाटन, मेळाव्यातून
दांडगा 'जन-संपर्क' साधू
अमक्क करू, ढमक्क करू
याव करू अन् त्याव करू
चांगल करू, छान करू
मतदारसंघाचं 'नाव' करू
पत्रके वाटू रॅली करू
सगळयांना एक नारा देऊ
करायचं किंवा नाही करायचं
ते निवडून आल्यावर पाहु
'आचारसंहिता' आपली वेगळी
आचार आपला वेगळा दाउ
मतांचं गणित जुळवण्यासाठी
जातीचं समीकरण वापरुन पाहू
युती, आघाडी , आलियन्स
वेगवेगळी नावे देऊ
नाही जमल्यास तसं काही
एकमेकांची "धुणी" धुवू
प्रचार, प्रसार आणि 'प्रसाद'
यांवर पाण्यासारखा पैसा वाहू
निवडून आल्यावर मात्र
आपलं घोडं गंगेत न्हाऊू !
- धनंजय चौधरी
No comments:
Post a Comment