इतकी नाजुक इतकी अल्लड, फुलपाखाराहून हळवार,
चालू बघता नकळत होते वार्या वरती अलगद स्वार, ...इतकी नाजुक ……. ||
भिजल्या देही गवाक्षतुनी चन्द्र किरण ते पड़ता चार,
लक्ख गोरटी रापून जाली रात्रीत एका सावळनार, ...इतकी नाजुक ……. ||
इतकी नाजुक... जरा निफेनी जोर देऊनी लिहिता नाव,
गालीत आली दुसर्या दिवशी अंगा अंगावर हळवे घाव, ...इतकी नाजुक ……. ||
इतकी नाजुक, इतकी सुन्दर, दर्पण देखिल खुलावातो,
ती गेल्यावरती, तो क्षण भर प्रतिबिम्बाला धरु बघतो, ... इतकी नाजुक …….||
इतकी नाजुक की, जेव्हा ती पावसात जाऊ बघते,
भीती वाटते कारण जलात साखर क्षणात विरघळते, …इतकी नाजुक …….||
इतकी नाजुक की, आता तर स्मरणाचे भय वाटे,
नको रुताया फुलास असल्या माझ्या जीवनातील काटे ...इतकी नाजुक …….||
कवी - संदीप खरे
No comments:
Post a Comment