किती काळाचे आठव
भरून वाहतोय ऊर
नको वळून पहाया
खोलात उठते काहूर
संदर्भ जुने उरी जपता
अंग अंग येई शरारून
पोटोत ठेवून भूक अवघी
पक्षी सारे जाई भरारून
रिमझिम पाऊस पेरतो
सप्तरंग जणू आकाशात
गात्र गात्र िंचब आजही
शाळेतल्या पावसात
बेधुंत बेभान वादळासवे
पाऊस आज अमाप कोसळतो
शीणलेल्या बुरुजापरी मात्र
मी आतल्या आत ढासळतो
सतत सोबत करतो हा
जीर्ण शीर्ण जीवन प्रवासात
स्वत:स विसरून आलो मी
शाळेतल्या पावसात..
कवी - पुंडलिक आंबटकर
No comments:
Post a Comment