एकांतात अंत आठवतो
जीवनात तो नेहमीच असतो
आपल्या वागण्यावर आपणच
एकांतात खिन्न हसतो
कधी कधी एकांत
अंतर्मुख करतो
जीवनातला चढ-उतार
तळमळून सांगतो
कधी कधी एकांत
अचानक येतो
अन् न बोलता
निघून ही जातो
कधी कधी एकांत
गर्दीत भेटतो
कोणी नाही कोणाच
हळूच बोलतो
कधी कधी एकांत
खूप रडतो
डोंगरायेवद्या दु:खाची
महती सांगतो
कधी कधी एकांत
खलखळून हसतो
भूतकाळातल्या 'गमती'
आठवत राहतो
कधी कधी एकांत
पावसात भिजतो
आठवणींचा गंध
गुदमरून टाकतो
कधी कधी एकांत
गहिवरून येतो
जवळच्या माणसांची
'अजवळीकता' सांगतो
"'एकांत'" कसाही असला तरी
'संमती' असते न्यारी
'काहीतरी' करण्याची
'एकांतात' होते "तयारी"
- धनंजय चौधरी