नाकावरच्या रागाला औषध काय
गालावरच्या फुग्यांच म्हणण तरी काय……
माझी लाडली ग, माझी गोडली ग
सांगा आमच्या छकुली ला झाल तरी काय
नाकावरच्या रागाला औषध काय
गालावरच्या फुग्यांच म्हणण तरी काय
त्याच काय झाल! एक होती मुलगी
एकदा की नाही, ती जाम……म रुसली
जाम रुसली, जाम रुसली, कोपर्यात जाऊन बसली
काही केल्या हसेना, कुणाशी बोलेना…….
साऱ्या घराला अस झाल की….
तेव्हा काय खर नाय
नाकावरच्या रागाला औषध काय
गालावरच्या फुग्यांच म्हणण तरी काय
मग तिला समजवायला कोण कोण आल माहितीय
आधी आल अस्वल, बसल मारून फतकल….
कारण त्याच्या लक्षात आल….
त्याच्या चड्डीच तुटलय बक्कल……
मग आला ससा……
पांढरा शुभ्र लोकरीचा गुंडा कसा म्हणतो
बगा बगा मी तिला हसवतो कसा
पण झाल काय माहितीय
गेला रडत रडत, स्वताच ढसा ढसा
माकडोबा आले उडी मारत टना टना……..
इवल्या बावल्या केल्या….
पण त्याची हि दैना……
एकपण काय कुणाचाच काय चालेना उपाय……
चालेना चालेना चालेना उपाय……
मग आला मामा
उंदीर मामा? उम्ह….
मग चांदोमामा!
नाही रे,छोटू मामा
त्याचा काही न्यारंच छंद
पाहून सारा राजरंग
तो म्हणतो कसा
मंडळी हो ऐका सांगतो गोष्ट दोन मुलांची…….
पांडू ची बंडू ची, पांडू आणि बंडू ची…..
पांडू आणि बंडू, दोन होती मुल, एक होत शहाण, एक होत खुल……
पांडू होता हुशार, बंडू होता मट्ठ
पांडू ऐके आई च, बंडू करी हट्ट
पांडू होता पट्ट्या, बंडू होता रड्या
पांडू खाई पेढे, बंडू खाई छ
आये आये आये………आये
पांडू होता गुणी,बंडू होता गुच्छ
मी आहे पांडू आणि बंडू कोण? तूच!
तूच….! तूच…! तूच…………तूच
अरे हि पोरगी बोली की आणि हसली सुद्धा
नाकावरच्यारागाला औषधं काय
ला……..ला………ला
नाकावरच्यारागाला औषधं काय
ला……..ला………ला
नाकावरच्यारागाला औषधं काय
गालांचा थवा न ओठांची साय
कवी - सुधीर मोघे
(
चित्रपट :
कळत नकळत, १९८९)