Sunday 14 August 2016

खरं सांगू

खरं सांगू..
खरं सांगू..
हल्ली मला सुचतच नाही काही
प्रेमळ अथवा तत्सम काही
स्फुरतच नाही कसलाच विषय
अथवा विरहाच्या ओळी


तसा आळस वैगेरे आलेला नाही काही
आणि वैराग्य वैगेरे तर नाहीच नाही
भटकंती थांबलिये अथवा
हरवलिये नजर शोधाची


सौंदर्य शोधणारी भूक शमली असावी
उगाच नाही मन आता रमतं तिच्या विचारांमधे
आणि हसत असतं अथवा रमत असतं
तिच्या आठवणी आठवूनी


शब्दांची गुंफण गुंफतच नाही
कितीही केला प्रयत्न तरी "ती"
जातच नाही विचारचक्रातून
अथवा स्वपनातून, प्रत्येक सांयकाळी


असा एकही क्षण तिच्याशिवाय जात नाही
कारण असतेच ती अणू-अणूमधे
अथवा समोरच्या आरशामधे दिसणार्या
प्रतिबिंबात नेहमीसारखी..खरीखूरी


वाटते आता ऐकूया मनाचे ह्यावेळी
विचारांपेक्षा करूया मनाला "follow"
अथवा घेवूयात ध्यास
प्रीत मिळवण्यासाठी

खरं सांगू..
ह्या भावना आहेत की फक्त शब्द,
माहित नाही
स्वप्न आहे की ध्यास
हे देखील अजून उलगडलेलं नाही
असेल का प्रीत अथवा चाहूल
तिच्या मनातदेखील माझ्यासारखी...
खरं सांगू..
https://dc.kavyasaanj.com/2016/08/dc-khara-sangu.htmlमाहित नाही..

 - धनंजय चौधरी