Saturday, 30 May 2015

आठवण आली काय… नाही काय…

https://dc-kavyasampada.blogspot.com/2015/05/aathavan-aali-kaay.html
 काहीच वाटत नाही …
 कोणी असलं काय… नसलं काय… 
 सवय मनाला झालीय हसण्याची 
 दु:खात काय अन सुखात काय … 

हल्ली कोणाला फरकच पडत नाही
'आठवण' आली काय… नाही काय… 

दिवस सरत नाही… 
सोबत कोणी असले काय… नसले काय… 
सल सलते आठवणींची 
आनंदाची काय… सुखाची काय… 

हल्ली कोणाला विचारताच येत नाही 
'आठवण' आली काय… नाही काय… 

धाडसच होत नाही… 
जमणार असले काय… नसले काय… 
सवय झालीय नेहमीच्या  रस्त्याची 
सुखकर असला काय… नसला काय… 

हल्ली कोणाला विचारण्याची सोय नाही 
'आठवण' आली काय… नाही काय… 

कविता जुळतच नाही… 
शब्द नेहमीचे असले काय… नसले काय… 
सवय सुटत नाही ओळींची 
प्रेमाची काय… विरहाची काय… 

हल्ली 'मन' कासावीस होतच नाही 
'आठवण' आली काय… नाही काय… 

-धनंजय चौधरी