Friday 4 April 2014

कविता आणि शास्त्र

ती म्हणाली - तू खूप छान बोलतोस ,
लिहित-बिहित जा काहिबाही

आमच्या कविमनाला स्फुरण चढले
भावना उतरवल्या कागदावर मग मी

ती म्हणाली- शब्द जमले पण यमक नाही
अजून थोडे प्रयत्न, जमेल बघ तुलाही

यमक जुळावेच लागतात का भावना मांडण्यासाठी
कि त्याशिवाय कविता म्हणजे फक्त शब्दांच्या ओळी

ती म्हणाली- तसं नाही रे काही…
तुला कि नाही काही समजतच नाही मुळी
'प्रत्येक गोष्टीला शास्त्र असते '
 अशी आजी म्हणते माझी

तू एक काम कर एखादा लेखच लिही मस्तपैकी…
त्यात नसतात यमक असतात फक्त ओळी

कविता आणि शास्त्र, भावना आणि संवेदना
मग सुचेनासं झाल मला काहीहि ….

ती म्हणाली- काय तू… तुला एक कविता सुद्धा जमत नाही

मग काय काढली जुनी वही
ऐकवली तिला एक त्यातली
तिने विचारलं तू लिहिली
मी म्हटलो- काय फरक पडतो,
तुला कशी वाटली…
ती म्हणाली- कवीला काही जमली नाही
शब्द बापडे कसे सजवावे हे देखील कळले नाही
अर्थच मुळी उमजला नाही आणि
 उपमा तर तू विचारूच नको काही
मला वाटतंय कि तूच लिहिली असशील
काय बरोबर ओळखलं  कि नाही….
मंद मंद हसत ती वदली

मी म्हणालो- नाही तुझ्याच आवडत्या कवीची  होती….

धनंजय चौधरी