Monday, 28 December 2020

बाई माझी करंगळी मोडली

ऐन दुपारी यमुनातीरी
खोडी कुणी काढली
बाई माझी करंगळी मोडली

जळी वाकून मी घट भरताना
कुठून अचानक आला कान्हा
गुपचूप येऊन
पाठीमागून
माझी वेणी ओढली
बाई माझी करंगळी मोडली

समोर ठाके उभा आडवा
हातच धरला माझा उजवा
मीही चिडले
ईरेस पडले,
वनमाला तोडली
बाई माझी करंगळी मोडली

https://dc.kavyasaanj.com/2020/12/bai-majhi-karangali-modali.html

कवी - ग. दि. माडगूळकर 





No comments:

Post a Comment