Saturday, 2 January 2021

वांग्याच्या भाजीचा रस्सा न गपगप शिरा

ऐकून घ्या बे पोट्टेहो
साऱ्या पाऊणे मंडळींची जेव्वाची व्यवस्था मागच्या मैदानात केली हाय .
अन हवं… वांग्याची भाजी बी जेवजा अन गपगप शिरा बी दाबजा
दाबजा…..दाबजा
अन हवं…
दाबजा शिरा भी दाबजा…

ताटात वाढला कांदा न कापला खीरा रे
ताटात वाढला कांदा न कापला खीरा रे
आलू वांग्याच्या भाजीचा रस्सा न गपगप शिरा रे
आलू वांग्याच्या भाजीचा रस्सा न गपगप शिरा रे

अरे वो बबल्या अबे लेका वांग्याची भाजी वाढ न बे बाप्पू ले…

आलू वांग्याची भाजी सुहानी ईदर्भाची ही जनता दिवानी…
आलू वांग्याची भाजी सुहानी ईदर्भाची ही जनता दिवानी
भाजीच्या संग रोडगा भारी हिरव्या मिरच्याचा ठेचा अंगारी

पेवाले देल्लं न ताक न ताकात जिरा रे
पेवाले देल्लं न ताक न ताकात जिरा रे
आलू वांग्याच्या भाजीचा रस्सा न गपगप शिरा रे
आलू वांग्याच्या भाजीचा रस्सा न गपगप शिरा रे

अरे इथं बी खाईन घरी बी नेईन घरचैयले जेवाले घेऊन येईन
इथं बी खाईन घरी बी नेईन घरचैयले जेवाले घेऊन येईन
नेवाले डब्बा म्या आणला मोठाला झोरा रे
नेवाले डब्बा म्या आणला मोठाला झोरा रे

आलू वांग्याच्या भाजीचा रस्सा न गपगप शिरा रे
आलू वांग्याच्या भाजीचा रस्सा न गपगप शिरा रे

ताटात वाढला कांदा न कापला खीरा रे
ताटात वाढला कांदा न कापला खीरा रे
आलू वांग्याच्या…
आलू वांग्याच्या…
आलू वांग्याच्या भाजीचा रस्सा न गपगप शिरा रे
आलू वांग्याच्या भाजीचा रस्सा न गपगप शिरा रे
आलू वांग्याच्या भाजीचा रस्सा न गपगप शिरा रे
आलू वांग्याच्या भाजीचा रस्सा न गपगप शिरा रे

च्या बईन भल्ल मस्त जेवण झाल राजा !

https://dc.kavyasaanj.com/2021/01/vangyachi-bhaji-an-gap-gap-shira.html/

कवी  - रुपेश सरातकर (YFP official song)

No comments:

Post a Comment