Saturday, 28 February 2015

मला बोलायचंय तुझ्याशी

मला बोलायचंय तुझ्याशी थोडंसं
सांगायचंय खूप सारं
दिवस राञ इकडं तिकडं दिसतं
तुझंच रूप गोजिरं

मला विचारायचंय तुला जरासं
सांगशिल का खरं
प्रेमाने माझ्या हातात हात
देशिल का बरं

मला सांगायचंय तुला काहिसं
पण सांग अगोदर
मी काही चूक बिक तर
नाही ना करत

मला द्यायचंय तुला सारं
माझं मन , मनाचं राज्यं
जे काही आहे ते सगळं
अगदी माझं नाव पण..

मला राहयचंय तुझ्यासोबत आयुष्यभर...
धनंजयराजेंचं राज्यं , मनो-राज्यकारभार
सांभाळशील का दरबार
आनंदाने...आयुष्यभर...

- धनंजय चौधरी 




Sunday, 8 February 2015

प्रेमामध्ये पडलोय

जगावेगळी राहणी अन
मंजुळ तिची वाणी
नजरेतला लाजरा भाव
जसे उन्हात थंडगार पाणी

हसताना ती अधिकच
सुंदर मला भासत असे
जणू हास्याला जगात
तिच्याच चेहऱ्यावर शोभा असे

तिच्या त्या वक्तृत्वावर
पावसासारखी छाप होती
प्रत्येक थेंब अन थेंब जणू
चिंब - चिंब भिजवणारी

मला सांगतसे ती नेहमी
मी अशीच नाही , तशी आहे
कधी उगाच रुसवा आणुनी
म्हणे-तशी नाही , मी अशीच आहे

बोलण्यासाठी विषय निवडावा
लागायचा नेहमी मला
कारण कि , कारणमिमांसा करण्या
कारणे द्यावी लागायची मला

आम्ही काहीतरी रोमांटीक
कधीच बोललो नाही
भांडण-रुसवा सोडवण्याशिवाय
कधीच काही जमलच नाही

तरीदेखील नेहमी
आहेच ती
स्वप्नी, मनी आणि
माझ्या ध्यानी

कधी रात्री उगाच
स्वप्नात येवून भांडे
तर कधी एकांतात येवून
गाली खुदकन हसे

ती पाहत नाही जाताना
हसत नाही पाहताना
सल सलते मनाला काही अन
अचानक वळून हसते ती जाताना

बरेच दिवस चाललाय
नजरेचा खेळ
एकदातरी व्हावा
शब्दांचा मेळ

उद्या काय घडावे
हे आजच मी ठरवतोय
शब्दात शब्द अडखळलेत
म्हणजेच आम्ही प्रेमामध्ये पडलोय ??
… प्रेमामध्ये पडलोय !!!

- धनंजय चौधरी 
http://dc-kavyasampada.blogspot.com/2015/02/dc-premat-padloy.html