Sunday, 26 July 2015

येशील ना ग परतून

पावसाचे आपल बरे
ढ्गातुन येऊन सुखवायचे
आठवणींचे तसे नव्हे
त्याचे काम मनाला दु:खवायचे

पाउस येऊन गेल्यावर
बाग प्रसन्न होते
तुझी आठवण आल्यावर
मन माझे खिन्न होते

जालीम आजारावर
जालीम औषध असते
जालीम जखमा मनावर,
एकही उपाय का नसते(?)

आठवण झाली देवदासची
पण तुला राग आहे व्यसनांची
सख्य करून त्याच्याशी
माझी नाही इच्छा तुला दुखवायची

विचारंती ‘विचार’ आला तुझा
तू सुद्धा विसरली नसशील मला!

आरशात जेव्हा शृंगार
करून तू पाहत असशिल
माझ्या शब्दांची नक्की
तू आठवण काढत असशिल

एकांतात तुझ्या मनात
‘घर’ मी करत असेल
आसपासच्या गर्दीत नजर
तुझी मलाच शोधत असेल

फुलांचा सुहास घेताना
डोळे तुझे आपसूक बंद होत असेल
फूल तुला देत असतानाचा
मीच तुला आठवत असेल

आठवणीत माझ्या जाशील तू हरवून
अन् ओल्या डोळ्यांनी
येशील तू परतून!
येशील ना ग परतून !?!?!!
https://dc.kavyasaanj.com/2015/07/yeshil-na-gg-partun.html

- धनंजय चौधरी