Thursday, 10 December 2020

पाऊस आठवणींचा

पाऊस येता दाटून येतो,

मेघ आठवणींचा.

कधी धूसर, कधी कोंदट,

कधी ओल्याचिंब आठवणींचा.


कधी रेनकोट, कधी छत्री,

कधी वळचणीतील आठवणींचा.


कधी कागदी होड्या, कधी डबक्यातील उड्या,

कधी कापड्यांवरील चिपल्यांचा.


कधी मित्रांबरोबर पार्टी, कधी उनाड मस्ती,

कधी तिच्याबरोबरीने भिजलेल्या कातरवेळीचा.


कधी बायकोबरोबर भिजत टपरीवर, तर कधी घरातच,

खाल्लेल्या कांदा भजी अन वाफाळलेल्या चहाच्या.


कधी गॅलरीत पडणार टपटप पाणी अन रेडिओवरील मंजुळ गाणी,

तर कधी म्हाताऱ्या बायकोला तरुणपणातील आठवणी सांगून मारलेल्या कोपरखळीच्या
https://dc.kavyasaanj.com/2020/12/pavus-aathwanincha-by-vaibhav.html

कवी - वैभव डांगरे  





No comments:

Post a Comment