Wednesday, 19 January 2011

आयुष्य

आयुष्य म्हणजे एक गंमत
तिखट - गोड क्षणांची सुरेख संगत

आयुष्य म्हणजे एक मजा
परीक्षा नावाच्या गोष्टीची सजा

आयुष्य म्हणजे एक अपेक्षाभंग
अशक्य मिळवण्यात सदैव दंग

आयुष्य म्हणजे एक गार वारा
उन्हाळ्यात पाऊस अन गारा

आयुष्य म्हणजे एक संधी
कधीतरीच येते दुःखाची मंदी

आयुष्य म्हणजे एक सुगंध
अनपेक्षित सुखाचा ऋणानुबंध

आयुष्य म्हणजे एक आश्चर्य
कधीच न कळणारे  तात्पर्य 

आयुष्य म्हणजे एक व्यथा
जगण्या - मरण्याची छान कथा

आयुष्य म्हणजे एक आशा
पदरी न पडण्याची निराशा

आयुष्य म्हणजे एक टोळका
अनेक विचारवंताचा घोळका

आयुष्य नावाची गोष्ट
अगदीच क्लिष्ट
सरतेशेवटी करते जगाला
जय महाराष्ट्र !!!


 - धनंजय चौधरी

[Published on 'अस्तित्व' board in MESCOE, on date 22/02/2011]