Monday, 27 February 2023

दुनिया डोक्यावर घेणार हाय रं!

तुझी तुलाच पुरी करायची 
हौस आकाशी उंच उडायची.... (2)

गड्या तयारी ठेव र मनाची 
कधी झुकायची कधी नडायची

दुनिया डोक्यावर घेणार हाय र 
तुला उचलून घेणार हाय र ...(2)

आला जरी कधी कठीण क्षण तो 
खंबीर उभ तु ऱ्हायच ,
गड्या खंबीर उभ तु ऱ्हायच...

हाटायच नाय गड्या झटायचं ,
पुढं पुढं तु चालत जायच...
पुढं पुढं तु चालत जायच...

ताज्या दमाच तरुणाईच
मिळालं रे वरदान... 
तुला  मिळालं रे वरदान...

रेशमी कापड हातात तुझ्या
करू नको बारदान
त्याच करू नको बारदान...

आईबापाच्या पायावर डोक
बाकी जगाशी ऱ्हा रोकठोक

अगदीच नाही अस पण नाही 
साथीला शिल्लक चांगली लोक 

सलामी झुकून
सलामी ठोकून 
सलामी वाकून 
देणार हाय र 
तुला उचलून घेणार हाय र ...

दुनिया डोक्यावर घेणार हाय र ...
तुला उचलून घेणार हाय र ...
https://dc.kavyasaanj.com/2023/02/Tujhi-tulach-puri-karaychi-kavita-lyrics-by-omkar-bhojane.html

- ओंकार भोजने





Wednesday, 1 February 2023

चांदोबा चांदोबा भागलास का

चांदोबा चांदोबा भागलास का ?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?
निंबोणीचे झाड करवंदी,
मामाचा वाडा चिरेबंदी !

आई-बाबांवर रुसलास का ?
कसाच एकटा बसलास का ?
आता तरी परतुनी जाशील का ?
दूध न्‌ शेवया खाशील का ?

आई बिचारी रडत असेल,
बाबांचा पारा चढत असेल !
असाच बसून राहशील का ? 
बाबांची बोलणी खाशील का ?

चांदोबा, चांदोबा कुठे रे गेला ?
दिसता दिसता गडप झाला !
हाकेला 'ओ' माझ्या देशील का ?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का ?

https://dc.kavyasaanj.com/2023/01/chandoba-chandoba-bhaglas-ka.html

कवी - ग. दि. माडगूळकर