Saturday, 13 June 2020

गरिबीचे चटके

तुम्हा आम्हाला सांगून कळेल का ....
गरिबीचे चटके बसने म्हणजे काय असतं ....

भर उन्हात दिवसभर तळपणं काय असतं....
अन,तळपूण तळपूण करपणं काय असतं....

कोरोनामुळे सगळे जग जणू थांबले आहे....
लोक मनाने लांब होतेच आता तनानेही लांब झाले आहे....

गेली कित्येक दिवस हाताला काम नाही....
पोटाची खळगी भरायला खिशातही दाम नाही....

भुकेल्या पोटाने आशेने पाहणाऱ्या नजरा....
देतो आहे  दिलासा चेहरा ठेऊन हसरा....

घरात उरला नाही दाणा अन घरही आता उरले नाही....
रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांसारखी आमची गत झाली....

कुठं जावं-काय खावं नाही कशाचं ठाव ठिकाणा....
स्वगृही परतायला साधी वाहनेही मिळेना....

चटके बसून बसून आता पायही बधिर झाले....
घरी जाण्याच्या आधिच आता प्राणही कंठाशी आले....

उधळून गेल्या पुष्पपाकळ्या टोचती फक्त काटे....
येतील का रे परमेश्वरा पुन्हा ते क्षण सुखाचे.....

https://dc.kavyasaanj.com/2020/06/garibiche-chatake-poem-by-kaveri.html

कवयित्री - कावेरी डफळ








2 comments: