Wednesday, 3 June 2020

फरक


पुरुष रडला तर सगळे जाग हेलावते,
स्त्री रडली की काजल वाहून जाते.
अश्रू एकच पण किंमत एकच नसते

पुरुष बोलला की मनमोकळा असतो
स्त्री बोलली की ती काजाग असते
नाहीतर तिची वायफळ बडबड ठरते

पुरुष मेला की घर उजाड होतं,
स्त्री मेली की सवत जागा घेते.
मृत्यू एकच पण त्यातही स्वार्थ असतो.
स्त्रीच्या मरणाला काहीच का अर्थ नसतो

मानव हा मानवच असतो
त्यात फरक तो काय असतो?

कवयित्री - कावेरी डफळ




No comments:

Post a Comment