Sunday, 7 June 2020

ती


सर्वांग सुंदर किमया
आहे निसर्गाची ती...
जितकी नाजूक-कोमल
तितकीच कठोर आहे ती...

जन्म घेतल्या पासून ऐकत असते
अखंड सूचनांचा पाढा ती.....
असे वागावे-तसे वागावे,
सर्वांचे पटवून घेते ती.....

शिक्षण घेत असताना हळूच
पंखांना बळ देते ती...
बुद्धीची चुणूक दाखवून,
उंच भरारी घेऊ इच्छिते ती....

आसमंतात मुक्त विहार,
करण्याचे स्वप्न पाहते ती....
नकळत अनोळखी लोकांत जाऊन,
इतरांची स्वप्न पूर्ण करते ती....

सहचारिणी झाल्यावर आपली स्वप्ने
जोडीदाराच्या डोळ्यात पाहते ती....
आपल्याला जे जमले नाही,
मुलांच्या रूपाने पूर्ण करते ती....

ना कसली तक्रार कधी,
ना खंत कधी करते ती....
स्वतःला दिवसरात्र खपवून,
संसाररूपी नौका पार लावते ती....
संसाररूपी नौका पार लावते ती....

कवयित्री - कावेरी डफळ




1 comment: