Thursday, 28 February 2019

समजूतदारपण

स्वतःची
समजूत
घालता
घालता
समजूतदारपण
मनात
घट्ट
रुतून
बसतं.
आतल्या
पोकळिशी
जुळवून
घेत
त्याचा
पिंड
मजबूत
होतो.
समुजतदारपण
पुसून
टाकतं
तक्रारीचा
अवखळ
आलेख.
आणि
निस्तब्ध
हृदयाची
समांतर
समांतर
होत
जाते
रेघ.
समजूतदारपण निवृत्तीची रंगीत तालीमय.
समजूतदारपण वरून संथ, आतून जालीमय.


कवयित्री - योजना यादव 




No comments:

Post a Comment