Sunday, 18 July 2021

समुद्र बिलोरी ऐना

समुद्र बिलोरी ऐना

सृष्टीला पाचवा महिना

वाकले माडांचे माथे

चांदणे पाण्यात न्हाते

आकाशदिवे लावित आली कार्तिक नवमीची रैना

समुद्र बिलोरी ऐना…

कटीस अंजिरी नेसू

गालात मिश्‍कील हासू

मयुरपंखी मधुरडंखी उडाली गोरटी मैना

समुद्र बिलोरी ऐना…

लावण्य जातसे ऊतू

वायाच चालला ऋतू

अशाच वेळी गेलिस का तू करुन जीवाची दैना

समुद्र बिलोरी ऐना…

https://dc.kavyasaanj.com/2021/07/samudra-bilori-aina-by-borkar.html

कवी - बा. भ. बोरकर