KS Links

Tuesday, 16 June 2020

संगतीने तुझ्या

संगतीने तुझ्या मी जेव्हा
घनदाट वनातून चालले,
वाटले रानातले सारे
काटेही सुगंधी झाले  ।।

केव्हा ,कशा जखमा
झाल्या होत्या कळेना
पानांच्या हिरव्या मखमालीने,
केव्हा दिला गारवा आठवेना  ।।

भावना झाल्या अनावर अन
सुखाचे कोंब फुटले,
डोळ्यात दाटलेले अश्रू तू,
नकळत ओठांनी टिपले ।।

होता स्पर्श तुझा उठली
अंगावरी शिरशिरी,
आकाशातून मग वरूनराजही,
प्रेमतुषारांचा अखंड वर्षाव करी  ।।
https://dc.kavyasaanj.com/2020/06/sangtine-tujhya-by-kaveri.html

कवयित्री - कावेरी डफळ









No comments:

Post a Comment