KS Links

Thursday, 7 July 2022

काच

डोळ्यातून रंगित सांज 
परतली आज 
भटकल्या गायी... 
व्याकुळ अनावर 
धूळ पसरली बाई. 

खिडकीला टेकुनि पाठ 
कशी वहिवाट 
बावरे न्यारी 
अंगात रुते कीं कांच 
तुझ्या दुखणारी. 

ओलेच उदविले केस 
तुझ्या स्मरणास 
दिसे पडशाळा 
बगळ्यांची झुलती 
मंद फुलांची माळा. 

झाडांत संपती दूर 
मंदिरें चूर 
बिलगती जैसीं 
घर तुला खुणावे 
तूंच अशी वनवासी. 

डोळ्यांत गुंफुनी थेंब 
जराशी थांब;
देह राख हलणारा 
हिमकंपित इथला 
भणभण फिरतो वारा... 
https://dc.kavyasaanj.com/2022/07/kaach-sandhyakalchya-kaita-by-kavi-gres.html

कवी - ग्रेस (काव्यसंग्रह : "संध्याकाळच्या कविता", पॉप्युलर प्रकाशन, मुंबई)



"काच" हि कविता ग्रेस ह्यांच्या "संध्याकाळच्या कविता" ह्या पुस्तकातून घेतली आहे. त्या पुस्तकाची लिंक सोबत देत आहे : amazon.in/Sandhyakalchya-Kavita-Gress



No comments:

Post a Comment