KS Links

Sunday, 6 June 2021

सुवर्णदुर्ग

करूनी मुजरा माझ्या राजाला , शिवाजी राजला... शिवाजी राजाला...
करूनी मुजरा माझ्या राजाला
जिजाऊच्या तेजस्वी पुत्राला,
ज्याने पावन केले भारतभूमीला,
नमन मराठ्याच्या दुधारी तलवारीला हो..जी जी जी...(२)

राजाने आरमार थोर उभारिले,
जलदुर्गही पारखून बांधिले,
रत्नागिरी हर्णे बंदरावर 
दुर्ग साकारला भव्य - बलवान,
दुर्ग साकारला भव्य - बलवान,
राजांनी नाव दिधले सुवर्णदुर्ग हो जी जी जी...(२)

उत्तराभिमुख भव्य प्रवेशद्वार,
दक्षिणेकडे भक्कम कोठार,
पायरीवर कोरली प्रतिमा कासवाची,
तटबंदीवर मूर्ती शोभे हनुमानाची,
मूर्ती शोभे हनुमानाची,
जिथे रचला आरमाराचा इतिहास हो जी जी जी...(२)

महाद्वारास नक्षीदार कमान,
दगडी चौथरे वाढवी राजवाड्याची शान,
पश्चिमेस एक चोरदरवाजा खास,
त्याची वाट जाऊनी मिळे समुद्रास,
त्याची वाट जाऊनी मिळे समुद्रास,
उभारिला फिरंग्यांचा कर्दनकाळ हो जी जी जी...(२)

खडकात तलाव खोदलेले,
सात विहिरी मोहक भासे,
दुर्गावर मंदिर एक ना दिसे,
दुर्गावर मंदिर एक ना दिसे,
देवड्यांच्या बाजूने पायऱ्यांची रांग हो जी जी जी...(२)

तुकोजी आंग्रे पराक्रमी सरदार,
कान्होजी पुत्र तयाचा मुत्सद्दी वीर,
युद्धात फितुर होता किल्लेदार,
कान्होजींनी पेलला सुवर्णदुर्गाचा हो भार...
पेलला सुवर्णदुर्गाचा हो भार....
हाती घेतली आरमाराची कमान हो जी जी जी...(२)

पाहुनी पराक्रम कान्होजींचा,
' सरखेल ' किताब महाराणी ताराबाईंनी हो दिधला,
असा सुवर्णदुर्ग तो महान,
असा सुवर्णदुर्ग तो महान,
ज्याने घडवला स्वराज्याचा सुवर्णकाळ हो जी जी जी...(२)

https://dc.kavyasaanj.com/2021/06/suvarnadurg-povada-by-kaveri.html

कवयित्री - कावेरी डफळ

‘सुवर्णदुर्ग’ हा एक असा किल्ला आहे की ज्याच्यामुळे समुद्री तटावरुन आरमाराच्या जोरावर आपले स्वराज्य शिवरायांना सुरक्षित ठेवता आले होते. इ.स.वी.सन 1660 मध्ये हा किल्ला स्वराज्यात आला होता. या किल्ल्याचे वर्णन कवयित्री कावेरी डफळ यांनी पोवाड्यातून सुंदररित्या केले आहे






No comments:

Post a Comment