KS Links

Tuesday, 5 January 2021

ओवणी

ओठांत कुठवर चिरडाव्यात 
अंतरीच्या हाका 
कवितेच्या सुईने किती
घालावा टाका 

जखम चिघळते 
घातलेल्याच टाक्यातून 
आकाश कोण ओवतं 
सुईच्या नाकातून 

https://dc.kavyasaanj.com/2021/01/ovani-unhachya-katavirudha-by-nagraj-manjule.html

कवी  - नागराज मंजुळे
(कवितासंग्रह : उन्हाच्या कटाविरुद्धआटपाट प्रकाशन  ) 



"ओवणी" हि नागराज मंजुळे ह्यांच्या 'उन्हाच्या कटाविरुद्ध' ह्या पुस्तकातून घेतली आहे. त्या पुस्तकाची लिंक सोबत देत आहे :

उन्हाच्या कटाविरुद्ध on Amazon.in
https://amzn.to/3ncTjct



No comments:

Post a Comment