KS Links
▼
गोकुळचा चोर
गोकुळचा चोर
लावी जिवाला घोर ...
नटखट भारी
कृष्ण मुरारी
गोपिकांचा चितचोर ....
देवकीनंदन
तो मनमोहन !
तो गवळयाचा पोर.....
डाव मोडुनी
पुन्हा मांडुनी
खेळतो बिनघोर .....
उरून पुरतो
पुरून उरतो
चोरावर तो मोर.....
लावुनी कळी
दुनियेला छळी
नामानिराळा थोर .....
कवी - श्री. देवीदास हरिश्र्चंद्र पाटील
No comments:
Post a Comment