KS Links

Friday, 17 July 2020

नववधू प्रिया मी बावरते

नववधू प्रिया मी बावरते
लाजते पुढे सरते, फिरते

कळे मला तू प्राण सखा जरी
कळे तूच आधार सुखा जरी
तूज वाचूनि संसार फुका जरी
मन जवळ यावया गांगरते

मला येथला लागला लळा
सासरी निघता दाटतो गळा
बाग बगीचा येथला मळा
सोडीता कसे मन चरचरते

जीव मनीचा मनी तळमळे
वाटे बंधन करुनि मोकळे
पळत निघावे तुजजवळ पळे
परि काय करु ? उरी धडधडते

आता तुच भय लाज हरी रे
धीर देऊनि ने नवरी रे
भरोत भरतील नेत्र जरी रे
कळ पळभर मात्र खरे घर ते

कवी  - भा. रा. तांबे





No comments:

Post a Comment