KS Links

Friday, 5 June 2020

सुंदर आयुष्य


आयुष्य किती सुंदर असतं
मानलं , तरच सुख असतं
नाहितर सगळंच दुःख असतं
खरंच आयुष्य किती सुंदर असतं
   
घडणाऱ्या प्रत्येक घटनेबरोबर, 
आयुष्य हेलकावे घेत असतं   
कधी अपयश तर कधी यशाच्या
शिखरावर नेऊन  ठेवत असतं
खरंच आयुष्य किती सुंदर असतं

सगळ्यांनाच मनाप्रमाणे
वागण्याची  इथे मुभा असते
चुकलं तर पुन्हा सावरण्याची
संधीही दिलेली असते
खरंच आयुष्य किती सुंदर असते

आयुष्यात जसं कर्म असणार आहे
तसंच फळही मिळणार आहे,
आज जसं पेरणार आहे ,
उद्या तसंच उगवणार आहे
खरंच आयुष्य किती सुंदर आहे


माणसाला आयुष्य मिळालं पण
त्याच महत्त्व नाही कधी कळलं
आयुष्य संपताना समजलं
किती पटकन आयुष्य सरलं
आता सुंदर म्हणायला आयुष्य कुठं उरलं

कवयित्री - कावेरी डफळ




No comments:

Post a Comment