KS Links

Friday, 12 June 2020

परिक्रमा


आपल्या जीवनाची वाटचाल
चालूच असली पाहिजे
रडत रडत न जगता
लढत लढत जगले पाहिजे

पाऊल पुढे टाकताना
दुसऱ्याकडे पाहू नका
जरी आकाशापर्यंत पोहचलास
तरी पक्षांना तुच्छ लेखू नका

वर चढता चढता कधी
देवाला विसरू नका
जरी विसरलास तरी उतरताना
मात्र त्याच्याकडे धावू नका

अरे वेड्या माणसा, तू
कितीही दूर पळालास तरी
जे संचित ते तुला भोगावेच लागणार
जीवनाची ही परिक्रमा पूर्ण
करावीच लागणार
https://dc.kavyasaanj.com/2020/06/parikrama-kavita-by-kaveri.html

कवयित्री - कावेरी डफळ





1 comment: