KS Links

पाऊस आणि आठवणी

पाऊस आणि आठवणी हा तसा माझा आवडता विषय...
काय गंमत असते कोण जाणे पण भारी वाटतं पावसात.
पाऊस पाहाताना किंवा पावसात भिजताना कोणती ना कोणती 'याद' गुंफलेली असतेच असते.
एखादा शाळकरी विद्यार्थी पाठीवर दप्तर, रेनकोट अशा अवतारात रस्त्यात साठलेल्या डबक्यात नाचताना पाहिल्यावर आपसूक मन भूतकाळात गेल्याशिवाय राहत नाही.
टपरीवर चहा पिण्यासाठी जमलेला ग्रूप, त्यात एखादा 'धूर' काढणारा टोळका, किंवा 'बाइक ट्रिप' वाले दिसले की मनात एक 'वेव्ह' येते आनंदोस्तुकाची.. मग आठवतात कॉलेजमधील सोनेरी, लखलखते 'दिन' आणि आठवतात मैफिली, दोस्ती.. एखाद दुसर्‍या 'कपल'ला पाहिल्यावर रोमॅंटिक होत आठवतं
प्रेम, माझ्या एका 'अती प्रिय मित्राला' कोणीतरी सांगितलेल्या "3 गोष्टी" <3 ❤️

पण ह्या सगळ्या आठवणी नंतर, आनंदाच्या वेव्हनंतर, चेहर्यावर आलेलं गोड हसू मावळू लागतात.. कोणास ठाऊक आणि पावसाचा जोर देखील कमी होऊ लागतात. थांबलेल्या गाड्या, वाटसरू, चहा टपरीवर जमलेली गर्दी, रस्ते पुन्हा आपल्या आपल्या कामी मार्गस्त होतात.

मनात मग एक वेगळीच भावना असते,
ती काय अन् कोणती, माहीत नाही! :)

- धनंजय चौधरी

No comments:

Post a Comment