KS Links

Friday, 14 February 2014

शब्दाविणा जाणून घे!

कुठेतरी कधीतरी
दिसली ती परी
जणू नभातून माझ्यासाठी
होती ती अवतरली

दोन तीन क्षणांचा
योग होता मिलनाचा 
शब्द शब्द शोधताना 
काटा सरकला काळाचा

काय सांगू मला
काय काय होते सांगायचे
डोळ्यात पाहिले तिच्या
अन् सांगायचे राहून गेले

तिच्याशी बोलताना
आवाज तो थरथरला 
काळजाचा ठोका माझा 
आनंदाने गहीवरला 

कधी जादू झाली
कोणता प्रसंग आठवू 
कशी झाली सुरवात
काय काय मी सांगू

मनाची अवस्था अशी
पुर्वी कधी झाली नव्हती 
का कुणास टाऊक 
येई सागराला जशी भरती 

अजूनही उमगत नाही
कोड त्या क्षणांचे
कसे व्यक्त करू 
माधुर्य त्या प्रीतीचे

माझच मला कळत नाही
माझ्या मनाला समजून हे
शब्दात मांडता येत नाही
शब्दाविणा जाणून घे
शब्दाविणा जाणून घे!!!!
https://dc.kavyasaanj.com/2014/02/shabdavina-janun-ghe-by-dc.html
धनंजय चौधरी